*भाजपात प्रवेश मिळविण्यासाठी महत्वाकांक्षी नेत्यांची धडपड*
देशमुखनगर (सतिश जाधव) : कराड उत्तर मतदार संघात भाजप पक्षाची ताकद वाढल्याने, भाजप पक्षात इन्कमिंगचा दरवाजा बंद होईल होऊ नये म्हणून इतर पक्षातील राजकीय महत्त्वाकांक्षी व स्वयंभू नेतेमंडळी पक्ष प्रवेशासाठी धडपड आहेत. वेगवेगळ्या मार्गाने फिल्डींग लावत असून भाजपात प्रवेश मिळविण्यासाठी खटाटोप करीत आहेत, मात्र निष्ठावंत हतबल झालेत.
पक्षात प्रवेशासाठी महत्त्वाकांक्षी व स्वयंभू नेते आणि कार्यकर्ते यांची पक्षप्रवेशासाठी मोठी रिघ लागली आहे, पण पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची मोठी गोची निर्माण झाली आहे. ज्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांना पक्ष सोडून तर काहींना हकलपट्टीच्या रोशाला सामोरे जावे लागले. झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार यांना पराभव करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली, पण त्यांना यश मिळाले नाही पण तेच कार्यकर्ते व नेते भाजप पक्षात प्रवेशासाठी लोकप्रतिनिधी व त्यांचे निकटवर्तीय यांच्या माध्यमातून भाजप पक्षात प्रवेशासाठी धडपड करत असल्याचे पाहून भाजपचे कार्यकर्ते विरोध करीत आहेत. आता पक्षाचे नेते काय भूमिका घेतात हा येणारा काळच ठरवेल. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, यासाठी भाजपचे अनेक अनेक इच्छिकांनी जे तयारी केल्याने त्यांची निराशा होऊ नये म्हणजे झाले.

Post a Comment
0 Comments