" *कृषि विज्ञान केंद्रात किसान सन्मान समारोहाचे आयोजन."*. देशमुखनगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मा. पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते दि.24 फेब्रुवारी, 2025 रोजी 19 व्या हप्त्याचा लाभ वितरीत करणेसाठी बिहार राज्यातील भागलपूर येथे भव्य किसान सन्मान समारोह संमेलन आयोजित केले आहे. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव येथे करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ऑनलाईन समारोहाचे थेट प्रेक्षपण पाहता यावे यासाठी कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे किसान समारोह/संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील माननीय मंत्री महोदय, माननीय पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई, माननीय खासदार तसेच माननीय आमदार ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. बोरगांव येथे माननीय आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा चे श्री. अजय शेंडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी परिसरातील प्रगतशील शेतक-यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुधारित कृषि तंत्रज्ञान, नैसर्गिक/सेंद्रिय शेती याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी दिनांक 24 फेब्रुवारी 2025, सोमवार रोजी सकाळी 11 वाजता, उपस्थित राहून मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments