बोरगाव परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न
देशमुखनगर : गेल्या काही वर्षात सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. प्रबोधनकारांच्या अति हस्तक्षेपामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे आणि कार्यक्षमतेने काम करण्यात अडथळे येत आहेत. स्थानिक पातळीवर प्रबोधनकारांचा प्रशासनावर अनावश्यक दबाव टाकला जात असून कायद्याच्या अंमलबजावणीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे इतर सर्व बेकायदेशीर धंदे व गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी अविश्वासाची भावना निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र दिसून येत आहे. हे बदलणे आवश्यक असल्याने नवीन रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एस वाळवेकर यांनी बोरगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था पूर्वस्थितीत करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. याचाच भाग म्हणून हजर झाल्या झाल्याच खोडद, जामगाव, अपशिंगे, नागठाणे, कुमठे, अतीत या गावांमध्ये अवैध चालू असलेल्या दारू आणि मटका या धंद्यावरती धडाकेबाज कारवाया केल्या, त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक वाळवेकर यांचे मनापासून स्वागत करण्यात येत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments