Type Here to Get Search Results !

महाशिवरात्रीचा दिव्य संदेश

 *महाशिवरात्रीचा दिव्य संदेश* 

देशमुखनगर : प्रिय बंधू-भगिनींनो प्रत्येक वर्षी शिवरात्रीचा उत्सव आपण मोठ्या प्रेमाने उमंग उत्साहाने साजरा करतो. शिवभक्त या दिवशी उपवास करतात रात्री जागरण करतात आणि भोला नाथाच्या भक्ती गीतांनी आकाश दुमदुमून जातो .

थोडा विचार करा की या पर्वाचे सत्य रहस्य काय आहे? शिवांना प्रसन्न करण्याची विधी काय आहे की ज्यामुळे आपले जीवन सुख शांती आनंदाने भरपूर होऊन जाईल .आपली पापे नष्ट होतील आणि आपणास मुक्ती जीवन मुक्तीची प्राप्ती होईल.

 परमात्मा "शिव" हे साऱ्या सृष्टीच्या मनुष्य आत्म्यांचे पिता आहेत. मनुष्य सृष्टी रुपी महानाट्याचा रचयिता आहेत व निर्देशक आहेत. परमात्म्याचे स्वरूप ज्योतिरबिंदू आहे .भारतात शिवलिंग पिंड रुपात पूजन केले जाते हेच सिद्ध करते की शिवांना मनुष्य व देवता समान शारीरिक रूप नाही म्हणून त्यांना निराकार विदेही म्हटले जाते.

परमात्मा शिवाच्या ज्योती स्वरूपाला विविध धर्मीय लोक कोणत्या ना कोणत्या रूपात स्वीकार करताना दिसतात .भारतात अमरनाथ,विश्वनाथ, सोमनाथ, बद्रीनाथ आधी तीर्थस्थान आहेत.मुस्लिम धर्माचे अनुयायी खुदाला "नुरे-ए-ईलाही"अर्थात नूर प्रकाश स्वरूपात मानतात .ईसा मसीहा म्हणतात. God is Light परमात्मा प्रकाश स्वरूप आहे.त्याला त्यांनी जिहोवा म्हटले आहे .गुरुनानक देव यांनी म्हटले कि एक ओंकार निराकार म्हणूनच परमात्मा सर्वांचे परमपिता आहेत. आपण सर्वजण त्यांची मुले आत्मा भाऊ भाऊ आहोत .म्हणून आम्ही म्हणतो हिंदू मुस्लिम सीख ईसाई आपस मे हम भाई भाई.

शिवरात्री -ज्ञान सूर्य प्रकट होई अज्ञानाचा अंधकार नाश होई.शिवरात्रीचे खरे रहस्य :-शिवरात्री अर्थात शिवजयंती शिव यांच्या अवतरणाचा स्मृतिदिवस म्हणून सर्व पर्वामध्ये महान पर्व महाशिवरात्री पर्व आहे. महात्मा धर्मात्मा , देवात्मा यांच्या जन्म जरी रात्री झाला तरी त्यांचा जन्म दिवस म्हणून संबोधतात. परंतु शिवांना शिवरात्री म्हणून संबोधतात .वास्तविक रात्री शब्द अज्ञानाचे प्रतीक आहे.

  शिव परमात्मा मनुष्यांना काम क्रोध ,लोभ,मोह,अहंकार यापासून मुक्ती देतात ,म्हणून त्यांना मुक्तेश्वर असेही म्हणतात.ज्यांची आठवण केल्याने पापाचा नाश होतो म्हणून त्यांना पापकटेश्वर सुद्धा म्हणतात.आम्ही शिवपिंडीवर *पांढरे धोत्र्याचे फुल* वाहतो याचा भावार्थ आहे आपल्यातल्या कडवटपणा अर्पण करून फुलाप्रमाणे स्वच्छ शुद्ध बनून सर्वांविषयी चांगले विचार मनात ठेवून आपण ईश्वरावर अर्पण झालो पाहिजे . *मुठभर तांदूळ* शिव पिंडीवर वाहने म्हणजेच जीवन धुतल्या तांदळासमान स्वच्छ चारित्र्यसंपन्न बनवले पाहिजे . *पिंडीवर असणारा लोटा व त्यातून पडणारे थेंब थेंब पाणी* म्हणजेच ईश्वराचे खरे ज्ञान रोज थेंब थेंब धारण केले तर त्या पिंडीप्रमाणे आपले मन थंड म्हणजे शांत राहते . *तीन पानाचे बेलपत्र* म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव त्रिमूर्ती हे त्याशिवांना अर्पण म्हणजे शरण गेले आहेत, आपणही स्वतःला ईश्वरावर अर्पण करण्याची खरी आवश्यकता आहे .

 *अर्ध प्रदक्षिणा घालतात* याचे प्रतीक म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यात येत नाहीत.तसेच सुखदुःख भोगत नाहीत. म्हणून शिवांना अर्धे फेरा मारतात. या सर्व स्थूल वस्तू तर आम्ही अर्पण करतोच पण खरी आवश्यकता आहे , *मनोमिलनाची* मनोमिलन म्हणजेच राजयोग सोप्या भाषेत परमप्रिय परमपिता शिव परमात्म्याची स्नेहमयी विधीपूर्वक आठवण करणे अर्थातच भारताचा प्राचीन राजयोग होय. ज्याची गीता शास्त्रात वर्णन केलेले आहे *ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात* ईश्वराची मनबुद्धी कशी जोडावी याचे मार्गदर्शन विनामूल्य केले जाते 

      राजयोगाचा अभ्यास शिकवला जातो.यामुळे जीवन जगण्याची कला व्यसनमुक्ती, मनाची खरी शांती, संबंधांमध्ये मधुरता अध्यात्मिक सशक्तिकरण ,कार्यव्यवहारात सफलता , शारीरिक व मानसिक स्वास्थ्य असे राजयोगाचे अनेक फायदे आपणाला होतात. परम शिक्षक शिव परमात्मा यांनी दिलेले मुख्य ज्ञानबिंदू म्हणजे बदला घेऊ नका परंतु स्वतःला बदला.

" *जसा संग तसा रंग" "जसं अन्न तसं मन* "सदैव आनंदी रहा घडून गेलेल्या घटनांची गोष्टींची चिंतन करू

 नका .नेहमी सकारात्मक चिंतन करा.

 *" योगी बना पवित्र बना "* 

   पावन पर्व महाशिवरात्रीनिमित्त आपणाला हार्दिक निमंत्रण

दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी ब्रह्माकुमारी विद्यालय बीएसएनएल ऑफिस शेजारी नागठाणे वेळ 11ते 1 ब्रह्माकुमारी डॉ सुवर्ण दीदी नागठाणे

Post a Comment

0 Comments