नागठाणे महाविद्यालयात प्रथमोपचार सेवा कार्यक्रम संपन्न
आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे व रामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत गुड समॅरिटन योजना प्रथमोपचार सेवा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. राजेंद्र कदम (जिल्हा व्यवस्थापक प्रथमोपचार सेवा, सातारा) यांनी गुड सेमेरिटन' योजनेची माहिती दिली. ही योजना शासनाच्यावतीने रस्ते अपघाताच्या 'गोल्डन अवर' मध्ये तात्काळ मदत करणाऱ्या व्यक्तीला गौरवण्यासाठी आहे असे सांगितले. तसेच त्यांनी प्रथमोपचाराची तत्त्वे म्हणजे जीव वाचवणे, पुढील दुखापती टाळणे, पुनर्प्राप्तीस प्रोत्साहन देणे, त्वरित कारवाई करणे आणि मदतीसाठी कॉल करणे होय. तसेच प्रथमोपचार कशाप्रकारे करावेत, संकट समयी कशी मदत करावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इतिहास विभागप्रमुख डॉ. अजितकुमार जाधव हे होते.
प्रथमोपचार सेवा कार्यक्रमात मा. मनोज पवार (उपजिल्हा व्यवस्थापक) डॉ. संजय वाळवेकर, डॉ. ऋषिकेश कुलकर्णी श्री सुहास माने श्री प्रफुल्ल शेलार उपस्थित होते. त्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी आपल्या मनोगतातून एनसीसी विद्यार्थ्यांनी आपतकालीन परिस्थितीत मदत करणारी १०८ नंबरची माहिती सर्व समाजात पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी व जाणीव जागृती कशी करावी. असे आवाहन केले.
तसेच या कार्यक्रमांमध्ये सर्व एनसीसी कॅडेट समोर अपघातग्रस्त रुग्णास कशी सेवा द्यावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. व ॲम्बुलन्स मधील सर्व सुविधांची व उपकरणांची माहिती करून दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश गभाले (सीटीओ) यांनी केले. तर आभार प्रा. शैला चोबे यांनी केले . सदर कार्यक्रमात श्री.लक्ष्मण हेबुले (सी टी ओ , श्री रामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे) श्री.संतोष पवार (पीआय) तसेच सर्व प्राध्यापक एनसीसी कॅडेट्स बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन महेश गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments