Type Here to Get Search Results !

वर्णै आबापूरी यात्रा सर्वांच्या समन्वयातून पार पाडावी.. तहसीलदार धायगुडे


 वर्णे-आबापूरी यात्रा सर्वांच्या समन्वयातून पार पाडावी 

हलगर्जीपणा केल्यास कारवाई 

नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे ; यात्रा आढावा बैठकीत सर्व विभागांना सूचना 

अंगापूर, ता. १८ : जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असणाऱ्या  वर्णे-आबापूरी येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथांची यात्रा ता.२३ मार्च (रविवार) रात्री हरिजागराने सुरू होवून २६ मार्च या कालावधीत होणार आहे. यात्रा भक्तभावाने उत्साहात व शांततेने पार पाडण्यासाठी शासनाच्या संबंधीत सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे, जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा केल्यास अथवा झाल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, अशा सूचना नायब तहसिलदार विजयकुमार धायगुडे यांनी दिल्या. 

   वर्णे-आबापूरी येथील यात्रा २३ मार्च ते २६ मार्च दरम्यान होत असून २४ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. याच अनुषंगाने प्रशासनाच्या सर्व संबंधीत विभागांची यात्रा आढावा बैठक येथील श्री काळभैरव मंदीरात पार पडली. यावेळी बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक डी. एस्. वाळवेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रविण धसके,  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस् ए राक्षे, महावितरणचे एस् व्ही पांढरपट्टे, अंगापूर आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी प्रसन्न कणसे, तासगावचे मंडलाधिकारी साळुंखे, एस टीचे शिंगाडे, देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, सरपंच शहाजी काळंगे व इतर विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

   यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी तसेच येणाऱ्या भाविक यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होवू नये याची खबरदारी घ्यावी. यात्रेपूर्वी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांनी यात्रेकरूंसाठी केलेल्या विविध उपाययोजना व सोयी यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे कौतुक केले. 

   यावेळी सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता नरबट व कुमार, पाणी पुरवठ्याचे पुस्तके, ग्रामसेवक अनिल कंठे, तलाठी अहिरेकर, बोरगावचे पोलिस सुनिल कर्णे, आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर अनघा तारळकर व त्यांचा स्टाफ, देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच चाकर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments