Type Here to Get Search Results !

जि. प. केंद्र शाळा नागठाणे वार्षिक स्नेहसंमेलन.



 जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नागठाणे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.


शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीक व बौद्धिक क्षमतांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विषयावरील सादरीकरणाने पालकांची व उपस्थितांची दाद मिळवली. शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी आणि जनजागृती करणारी अनेक सादरीकरणे मुलांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केली. या स्नेहसोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाची नवी ऊर्जा मिळाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना यानिमित्ताने वाव मिळाला. 


लेझीम पथकाच्या जोशपूर्ण सादरीकरणाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय वाळवेकर साहेब, नागठाणे गावच्या सरपंच रुपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप साळुंखे उपाध्यक्ष कविता साळुंखे आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले 

 यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अजित साळुंखे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका देशमाने मॅडम आणि जयश्री कणसे मॅडम यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली 


शाळेच्या मुख्याध्यापिका शांता डफळे यांनी विविध उपक्रमांचा आढावा सर्वांसमोर सादर केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व समाजासमोर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे कौतुक प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. 


सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सदाशिव साळुंखे, गणेश साळुंखे सर्व सन्माननीय सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.


शाळेच्या शिक्षिका विद्या पवार, नसीम तांबोळी, सविता गुरव, आशा ढाणे, अलका साळुंखे, वनिता पवार, कविता वडार, वैशाली मोरे, विद्या कोकाटे यांनी परिश्रम घेतले.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुमती मगर व सोनाली खाडे यांनी केले, आभार राजाराम खाडे यांनी मानले. 


शाळेच्या भव्य प्रांगणात रंगलेल्या या सोहळ्याने उपस्थिताची मने प्रफुलित झाली. शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या या जोशपूर्ण सादरीकरणास बक्षिसांच्या वर्षावात दाद दिली. 



प्रेक्षक मंत्रमुग्ध 

विद्यार्थ्यानी जागर गोंधळ विविध बालगीते यासारख्या विविध कला प्रकारांचे प्रभावी सादरीकरण केले छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यातून त्यांचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला. प्लास्टिक बंदी सारख्या सामाजिक समस्यां बाबत समाजाचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयावरील सादरीकरणातून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. बालचमुंचे लेझीम पथक या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले

Post a Comment

0 Comments