प्रभावती मोरे 58 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण.
(तब्बल 43 वर्षानंतर दिली दहावीची परीक्षा)
शिवथर. खेड नांदगिरी तालुका कोरेगाव येथील प्रभावती दगडू मोरे यांनी तब्बल 43 वर्षानंतर दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्या त्याबद्दल त्यांचं संपूर्ण परिसरामध्ये अभिनंदन केलं जात आहे.
प्रभावती मोरे या खेड नांदगिरी येथे 25 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत यापूर्वी त्यांचे शिक्षण सातवी पास होतं त्याने 1982 साली शिक्षण सोडलं होतं त्यांच्या हातून बऱ्याच मुलांना ज्ञान दानाचे काम करून मुलं घडवण्याचा काम त्यांनी केलेला आहे आणि करत आहेत मुलांना शिक्षण देत आपला वेळात वेळ काढून स्वतःची मुलं घडवत असताना दहावीच्या परीक्षेला त्या बसल्या आणि तब्बल वयाच्या 58 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्या.
त्याबद्दल बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments