Type Here to Get Search Results !

विक्रम शिंदे यांना साहित्यरत्न पुरस्कार.


साहित्यिक विक्रम शिंदे संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित



रहिमतपूर, १४ मे २०२५ : मराठी साहित्य क्षेत्रात  मानवतावादी कवितांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाच्या कार्याबद्दल तसेच  सातत्याने  मराठी साहित्य चळवळ वाढावी म्हणून पुस्तक लेखन, वाचन, निर्मिती, पुस्तक प्रकाशन यामध्ये नवनवीन प्रयोगांसह रचनात्मक पातळीवर केलेल्या योगदानाबद्दल कोरेगाव येथील वेळू गावचे युवा साहित्यिक विक्रम शिंदे यांचा २०२५ वर्षीचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा 'संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा साहित्यरत्न पुरस्कार' हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.


सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, लोकशाही टीव्हीचे संपादक विशाल पाटील, अ.भा. मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, कोल्हापूर विभाग अध्यक्ष विकास भोसले, डॉ. नितीन नाळे, हनुमंत चिकने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, यशवंतराव चव्हाण सभागृह, कराड येथे करण्यात आले.


हा पुरस्कार मी संत तुकाराम महाराज आणि अखंड भारताची सेवा व रक्षण करणारे जवान तसेच धारातीर्थ झालेले शहीद जवान यांना समर्पित करतो, असे पुरस्काराला उत्तर देताना विक्रम शिंदे म्हणाले.



- अधिक माहितीसाठी 

अमोल कुंभार, 

प्रदेश संघटक, अ. भा. मराठी साहित्य परिषद. 88051 28510

Post a Comment

0 Comments