Type Here to Get Search Results !

गायत्री बरकडे वर्ये केंद्रात प्रथम.




 श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालय लिंबची कु.गायत्री संजय बरकडे 96.20% गुण मिळवून विद्यालयासह वर्ये केंद्रात प्रथम तर विद्यालयचा दहावीचा निकाल 97.50%

शिवथर : श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालय लिंबची कु.गायत्री संजय बरकडे 96.20% गुण मिळवून विद्यालयासह वर्ये केंद्रात प्रथम आली.

     लिंब ता. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालय लिंबचा एस.एस.सी बोर्ड 2025 निकाल 97.56% लागला असून कु.गायत्री संजय बरकडे 96.20% गुण मिळवून विद्यालयात  तसेच केंद्रात प्रथम आली आहे. विद्यालयात  द्वितीय कु.सृष्टी भिमराव सावंत 92.40%, तृतीय कु.श्रिया राहूल सावंत 90.40%, तसेच अथर्व मडके 88.80%, सारिका तिगाडे  87.40% गुण मिळविले आहेत. 

     सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड सर, गुरुकुल प्रमुख दादासाहेब कचरे, वर्गशिक्षिका सौ.काशिद आर.ए. व सौ.साळुंखे एम.पी.,मार्गदर्शक सर्व विषय शिक्षक या सर्वांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, सचिव, सहसचिव, विभागीय अधिकारी, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, शिक्षक, सेवक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments