Type Here to Get Search Results !

प्रभावती मोरे यांचे उज्वल यश.


 प्रभावती मोरे यांचे उज्वल यश 

(वयाच्या 58 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण )

शिवथर :  शिक्षणाला वयाची मर्यादा नसलेल्या उक्तीनुसार अनुभव नुकताच कोरेगाव तालुक्यात आला आहे. खेड नांदगिरी येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रभावती दगडू मोरे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली. 

        सातवी शिकलेल्या प्रभावती मोरे या गेली 25 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना स्वतःही ज्ञानार्जन करून हे यश संपादन केले आहे. शिक्षणाची आवड आणि दहावी उत्तीर्ण होण्याचे ध्येय यातून हे यश मिळाल्याचे प्रभावती मोरे यांनी अजिंक्य न्यूज शी बोलताना सांगितले. सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तब्बल 43 वर्षानंतर दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि यश देखील संपादन केले. 

         त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील शिक्षण प्रेमी यांच्याकडून कौतुक होत आहे .त्यांना मिळालेल्या यशाबद्दल कोरेगाव बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments