Type Here to Get Search Results !

कामेरीच्या सुपुत्राला काश्मिरमध्ये आले विरमरण

 जम्मू कश्मीर मधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले त्यामध्ये 11 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करणारे कामेरी ता.जि.सातारा गावचे सुपूत्र श्री.शुभम समाधान घाडगे वय 28 हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले


शुभमचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे झाले माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय येथे तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी काँलेज अपशिंगे मि. येथे होऊन पुढे तो लष्करात भरती झाला


त्यांच्या जाण्याने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपूत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले असून शुभमच्या पश्चात आई-वडील,पत्नी,मुलगी,भाऊ असा परिवार आहे

Post a Comment

0 Comments