*माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची अपशिंगे (मिलिटरी) गावाला भेट*
*अपशिंगे (मिलिटरी) गावाच्या सर्वांगीण शासन कटीबद्ध*
*- माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब*
📍अपशिंगे (मिलिटरी) : मंगळवार, २४ डिसेंबर २०२४
आज सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथे आयोजित आजी-माजी सैनिकांचा मेळावा माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यास आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, अपशिंगे (मिलिटरी) गावाला सैनिकी परंपरा आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील एकतरी सदस्य सैन्यदलात कार्यरत असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या अपशिंगे गावच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला. पहिल्या महायुद्धात या गावातील ४६ जवान शहिद झाले होते. या तसेच गावातील माजी सैनिकांच्या शौर्याची माहिती बाहेरील लोका
Post a Comment
0 Comments