विक्रमसिंह पाटणकर वाढदिवशी पुर्व नियोजीत कार्यक्रमांमुळे परगावी.
विक्रमसिंह पाटणकर वाढदिवसादिवशी पुर्वनियोजित कार्यक्रमांमुळे परगावी. - राजाभाऊ शेलार.
प्रतिनिधी (राणी जाधव) : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तसेच पाटण विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते विक्रमसिंह पाटणकर ( दादा) यांचा शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे विक्रमसिंह पाटणकर ( दादा ) पाटण येथे उपस्थित राहू शकणार नाहीत याची दखल पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी घ्यावी असे आवाहन पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रकात राजाभाऊ शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, आपले नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे बाहेरगावी असल्याने शुक्रवार २७ डिसेंबर रोजी ते शुभेच्छा स्विकारण्यासाठी पाटण येथील त्यांच्या शिक्का मॅन्शन या निवासस्थानी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे याची नोंद पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार संघातील मतदार व हितचिंतकांनी घ्यावी. स्थानिक पातळीवर गावागावात वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करावा असे आवाहनही राजाभाऊ शेलार यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments