पालकमंत्री पद ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना द्यावे.
देशमुखनगर : सातारा जिल्ह्यातील पालकमंत्रीपदी सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नेमणूक करावी अशी मागणी नागठाणे येथील साक्षी उद्योग समूहाचे नितीन प्रतापराव साळुंखे यांनी केले आहे.
पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. कोणत्याही जिल्ह्याकरता जर पालकमंत्री म्हणून जिल्ह्याबाहेरील नेतृत्व आले तर पालकमंत्र्याच्या उपस्थिती अभावी जनतेची बरीच कामे खोळंबून राहतात व पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागते, त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जनतेच्या मनात असते की पालकमंत्री हा आपल्याच जिल्ह्यातील असावा. त्यामुळे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदी सातारा जिल्ह्यातील भरगच्च मतांनी निवडून आलेले नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच नेमावे अशी मागणी नितीन साळुंखे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments