राष्ट्रवादीला मिळेना नेतृत्व...!
देशमुखनगर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या तरीही कराड उत्तर मतदार संघातल्या अनेक गावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न सुटलेला नाही. राष्ट्रवादी फुटी नंतर येथे पक्षाला सर्वसमावेशक नेतृत्व मिळालेले नाही. झालेल्या विधानसभा निवडणुकीत तथाकथित बाजारी ुढार्यांची आयात करून गोवा बेरीज करत आचारसंहितेत ढोल वाजविले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निकालाच्या दिवशी सर्व ढोलांच्या चिंध्या झाल्या, पक्षात वेगवेगळे गट कार्यरत असल्यामुळे तसेच विरोधकांची ताकद वाढू लागल्याने गावागावात नेतृत्वाची धुरा नेमकी कोणाच्या हाती द्यायची हा प्रश्न नेत्यांच्या समोर आहे.
तीस-पस्तीस वर्षे अनेक निवडणूका जनतेने त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. फुटाफुटी नंतर राष्ट्रवादीला नेतृत्व मिळालेले नाही. गटागटात, गणा गणात, गावागावात कोणा एका नेत्याच्या नावावर एकमत होत नसल्याने नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार अशी चर्चा जनतेतून केली जात आहे.
आयात केलेल्या वेगवेगळे पुढारी आणि गट राष्ट्रवादी पक्षाचे काम करीत असले तरी, त्यांनी आपले वेगळे अस्तित्व ठेवले आहे, तरी यातील कोणा एकाकडे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेतृत्व देणार आणि कोण कोणाचे नेतृत्व मानायला तयार होणार....? हा प्रतिष्ठेचा विषय ठरणार.
Post a Comment
0 Comments