Type Here to Get Search Results !

माजी आमदारांची नैतिकता अख्या कराड उत्तरला माहिती आहे..मुरलीशेठ पोळ


 *माजी आमदारांची नैतिकता अख्या कराड उत्तरला माहित आहे*

      *मुरलीसेठ पोळ*

 देशमुखनगर : कराड उत्तर मधील विविध विकासकामांची भूमिपूजन व उद्घाटन कराड उत्तरचे विद्यमान आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते गावोगावी होत आहेत. माजी आमदारांना कोणीही बोलवत नाही त्याचे शल्य त्यांना झाल्यामुळे वैफल्यग्रस्तातून ते बिनगुडाचे आरोप करत सुटलेले आहेत. परंतु त्यांना आमचे एकच सांगणे आहे की आमचे नेते मा. मनोजदादा घोरपडे हे कामाचे आमदार आहेत.आपल्या सारखे बिनकामाचे  आमदार नाहीत.

         आपण म्हणता मी केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका, पण तुम्ही काय काम केले हे आख्या कराड उत्तरला माहित आहे. आपण गावोगावी कामाचे प्लेक्स लावले तेव्हाच आपल्याला जनतेने उत्तर दिलेली आहेत. नडसी सारख्या गावात कसं काय पाटील बर हाय का? तुम्ही जे केलंय खरं आहे का? आग बाई काय हा प्रकार अशा आशयाचे बॅनर लागले होते तेव्हाच आपलं कर्तुत्व जनतेने ओळखलेला आहे.

       शामगावचं पाणी प्रश्न निकाली काढताना आपण म्हनता ते मी केलेलं काम आहे परंतु आपणास आठवण करून देतो की ज्यावेळेस शामगाव ग्रामस्थ पाण्यासाठी उपोषणास बसले होते. तेव्हा आपण त्या ठिकाणी भेट दिली आणि लोकांना सांगितलं की आपल्याला पाणी देता येणार नाही. मग आज पाणी आल्यानंतर आपण कसं म्हणू शकता हे काम मी केलेल आहे. शामगांव, राजमाची, जायगाव या गावच्या एम.आय.टँक ला मा. ना. महेश शिंदे यांनी सिफारस व मान्यता दिली आहे.

   चिंचणी,हेळगाव,   गोसावेवाडी, पाडळी, गावातील रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील असून हा रस्ता केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे. त्या कामास आपला कोणताही संबंध नाही. आपणास सवय आहे मागच्या वीस वर्षाची पत्र पाठवायची आणि आजचं काम मी केलं आहे असा दिंडोरा पीटायचा. परंतु मी आपणास सांगू इच्छितो की एखाद्या आर्थिक वर्षातलं काम त्या किंवा पुढच्या आर्थिक वर्षात मंजूर होऊ शकतं परंतु मागील वीस वर्षांपूर्वी दिलेल्या पत्राने काम मंजूर झालं म्हणजे तुम्ही केलं असं होत नाही. आपली ही खोटी बोलायची वृत्तीमुळे कराड उत्तरच्या जनतेने आपल्याला घरचा रस्ता दाखवलेला आहे.

       

 हणबरवाडी धनगरवाडी ही योजना आपल्या काळात चाळीस वर्षे रखडलेली आहे ती आमचे नेते मा. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या कडूनच पूर्ण होणार आहे.कोपर्डी लिंक कॅनॉल द्वारे तारळी धरणाचे पाणी मसूर व कोपर्डे हवेली विभागाला दिलेले आहे. त्यामुळे शेतीला व पिण्यासाठी पाणी कसे द्यायचे हे आमच्या नेत्यांना चांगलंच माहित आहे."

Post a Comment

0 Comments