Type Here to Get Search Results !

खटाव तालुक्यातील उरमोडीकालव्याद्वारे पाणी देणार.. आ. मनोज दादा घोरपडे.आणि तारळी



 *खटाव तालुक्यातील उरमोडी आणि तारळी कालव्याद्वारे शेतीला पाणी देणार* : *आमदार मनोजदादा घोरपडे*
, *पहिल्या आवर्तनाचे केले पाणी पूजन*

देशमुखनगर : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरमोडी
कालव्यास यावर्षी प्रथमच आवर्तन देण्यात आले आहे. आमदार मनोज दादा घोरपडे यांनी रविवारी सकाळी दहा वाजता पुसेसावळी परिसरात पाणी पूजन करून पाणी तारळी कालव्यात सोडले.
खटाव तालुक्यातील उरमोडी प्रकल्पाच्या सिंचनासंबंधी पुसेसावळी येथील जनता दरबारामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या व निवेदने लक्षात घेऊन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतकऱ्यांसमवेत थेट उरमोडी खटाव कालव्याची पाहणी केली आणि पाणीप्रश्नाबाबात दखल घेतली.
यावेळी उरमोडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून उरमोडी व तारळी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेवून त्यांनी सविस्तर चर्चा केली. या कालव्यास यावर्षी प्रथमच सोडलेल्या आवर्तनातील पाणी पूजन त्यांनी केले आणि तारळी कालव्यात पाणी सोडले. तसेच पुढील भागातील शेतकऱ्यांनी त्वरीत मागणी अर्ज दाखल करून शेतीसाठी पाण्याचा वापर करावा, असे आवाहन केले. यावेळी पुसेसावळी, म्हासुर्णे, लाडेगाव आणि शेनवडी भागातील लाभधारक शेतकरी व सिंचन अधिकारी विकास बनसोडे, सहाय्यक अभियंता, शाखाधिकारी डी. जे. जाधव, महेश घार्गे, कृष्णात शेडगे, फरांदे, अनिल कदम, पांडूरंग वाईकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments