Type Here to Get Search Results !

हे तर वराती मागून घोडे..संपतभाऊ जाधव


 *हे तर वराती मागून घोडे*....

*चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता संपतभाऊ जाधव यांची टीका* 

देशमुखनगर : सह्याद्री कारखान्यांचे सभासद मा. संपतभाऊ जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार मध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी च्या अनुषंगाने भाष्य केलेले आहे. सह्याद्री कारखान्याच्या सभासदांचे अपूर्ण राहिलेले शेअर्सचे पैसे भरून घेण्यासाठी काढलेल्या पत्रकावरती "हे तर वरती मागून घोडे" असा पलटवार संपतभाऊ जाधव यांनी केलेला आहे.     

      सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी अधिसूचना जारी झाली असून मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याच्यावरती हरकती घेण्याचे काम चालू असून ज्या सभासदांचे शेअर्स पूर्ण नाहीत त्यांनी राहिलेले रक्कम भरून घ्यावी असे पत्र कारखान्याच्या वतीने काढण्यात आलेले आहे. 

       यावर प्रसिद्धी पत्रकात मा. संपतभाऊ जाधव म्हणाले आहेत की गेली पंचवीस वर्षापेक्षा जास्त  काळ चेअरमन असणाऱ्यांना २०२२ नंतर कधीही सभासदांना उर्वरित रक्कम देऊन पूर्ण शेअर्स देणार असल्याचे जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्याची बुद्धी आली नाही .परंतु आत्ता विधानसभेला आपला कोणीही पराभव करू शकणार नाही अशा आविर्भावात वावरणारे  माजी आमदार आज जनतेने घरी बसवल्यामुळे व येणाऱ्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होणार आहे हे दिसत असल्या कारणामुळे सभासदांना आकर्षित करण्यासाठी गेली आनेक वर्षे ताटकळत ठेवलेला निर्णय घेतलेला आहे. परंतु कारखान्यांचे सर्व सभासद सुज्ञ आहेत. आपण आजपर्यत न घेतलेले अनेक निर्णय घेण्याचा सपाटा चालू आहे.परंतू ज्या निर्णयामुळे आजपर्यत सभासदांना त्रास झालेला आहे. हे सभासद विसरणार नाहीत.ज्या पद्धतीने विधानसभेला परिवर्तन झाले आहे त्याच पद्धतीने सह्याद्री कारखान्यात सुद्धा परिवर्तन सभासद करणार आहेत.      आपल्या कारभाराला सामान्य सभासद कंटाळलेला आहे.

     आपण या पूर्वी कधीही न दिलेली साखर मोफत देण्याचे आश्वासन दिलेले आहे. आपण आजपर्यंत ही सभासदांना मोफत साखर देऊ शकत होता परंतु कारखान्यांमध्ये आपल्याला कोणीही विरोध करणार नाही त्यामुळे आपण आपल्या पदाचा गैरवापर करून सभासदांचे आर्थिक शोषण केलेले आहे. त्यामूळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव आटळ आहे. 

       वारस सभासदांच्या नोंदी विषयी गेली 10 वर्षापासून अनेक सभासदानी आपणास पत्रव्यवहार करून सुद्धा आपण ठराविक सभासदांच्या वारस नोंदी करून घेतल्या नाहीत. कारण आपणास सभासद वाढवायचेच नव्हते परंतु राहिलेले सभासद सुद्धा आपणास यावेळी घरचा रस्ता दाखवणार आहेत.

   " शेअर्सची अपूर्ण राहिली रक्कम भरून घेऊन पूर्ण शेअर्स करणे, शेअर्सच्या वारस नोंदी करणे व मोफत साखर देणे या निर्णयांचा कोणताही परिणाम निवडणुकीवर होणार नाही."

संपतभाऊ जाधव सभासद सह्याद्री कारखाना

Post a Comment

0 Comments