जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार तरीही शिवसेनेचा पालकमंत्री...!
देशमुखनगर (सतिश जाधव) : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात विपरीत परिस्थितीत भाजपचे चार आमदार निवडून आलेले असतानाही या जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री दिल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्ह्यात यापूर्वी राष्ट्रवादीचे वर्चस्व जास्त होते. जिल्ह्यात भाजपाला तुलनात्मक अस्तित्व असतानाही गेल्या पाच वर्षात जनसंपर्क आणि विकासात विकास कामात पक्षाने तसेच नेत्यांनी जोरदार कामगिरी करून भाजपाने जिल्ह्यात आपले चांगलेच बसतात बसवत चार आमदार निवडून आणले. मात्र राज्यात जास्त मताधिक्याने निवडून आलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या नेतृत्वाला पालकमंत्री पद देण्याऐवजी शिवसेनेला दिल्याने तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यात राजेंना मानणारा गट मोठा आहे सातारच्या दोन्हींही राज्यांनी जिल्ह्यातील जनतेचे हितसंबंध जपले आहेत, त्यामुळे या नेतृत्वाला प्राधान्य देणे अपेक्षित होते. माजी पालकमंत्र्यांना सातारा जिल्ह्याच्या प्रशासनाचा अनुभव असल्याने त्यांची नेमणूक केली गेली असावी, तरी काही जाणकारांचे मते हे एक भाजपाला एक प्रकारचे आव्हान देण्यासाठी केले असावे.
जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सातारचे पालकमंत्री पदी नियुक्त करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments