Type Here to Get Search Results !

सर्वोत्कृष्ट बॅक असलेल्या कृष्णा बॅकेचे ग्राहक व्हा.. भगवान जाधव


 सर्वोत्कृष्ठ बँक असलेल्या कृष्णा बँकेचे ग्राहक व्हा 


मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव


"देशमुखनगर : अकराशे कोटीहून अधिक एकत्रित व्यवसाय,एनपीए शुन्य टक्के, मोबाईल बँकिंग सेवा, सतत ऑडीट 'अ' वर्ग असणारी कृष्णा सहकारी बँक आहे. चेअरमन आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या  नेतृत्वाखाली ग्राहकांसाठी अर्थवाहिनी म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या या बँकेला राज्यातील सर्वोत्कृष्ठ बँकम्हणून अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. म्हणून ग्राहकांना कृष्णा बँक ही आपली बँक वाटते. कर्ज असो वा ठेवी असो,  या बँकेशी सातारकरांनी हक्काने ग्राहक व्हा," असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी केले.



कृष्णा सहकारी बँकेच्या सातारा शाखेचा नुकताच ग्राहक मेळावा पार पडला.या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती कृष्णा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव,  संचालक राजेंद्र कुंभार, अभिजित दोशी,सी.यू. कटारिया यांच्यासह सातारा शहरातील विविध मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संखेने उपस्तीत होते.



सातारा शाखेचे शाखाधिकारी शशिकांत कसबे यांनी,' बँकेची वैशिष्टे सांगताना मोबाईल बँकिंग, लॉकर सुविधा, शासनाच्या विविध विमा योजनांचा लाभ देणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेत ठेवीवर आकर्षक व्याजदर आहे.पोवई नाक्यावरील रामकृष्ण कॉलनी येथील सातारा शाखेत ठेवी आणि कर्जासाठी सातारकरांनी संपर्क करावा,'असे आवाहन केले.


यावेळी हेमंत देशमुख, राजेंद्र साळुंखे, राजन माने, हणमंतराव माने- पाटील , विद्या जाधव, विजयसिंह पाटील, नितीन पिसाळ, चंद्रकांत निलजीकर, प्रशांत गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बँकेचे संचालक राजेंद्र कुंभार यांनी तर आभार विजय जाधव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments