Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय एकात्मतेचे "सशक्त साधन" ...आ. मनोज दादा घोरपडे.


 राष्‍ट्रीय सेवा योजना राष्‍ट्रीय एकात्मतेचे  ‘सशक्त साधन’ 

मा. आमदार मनोजदादा घोरपडे

देशमुखनगर  :राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना समाजाची सेवा करण्याबरोबरच श्रमसंस्कार शिबीरातून सामुहिक सेवा करण्याचा अनुभव मिळतो त्यातूून त्यांचे संघटन कौशल्य विकसित होते. आणि व्यक्तिमत्व विकास घडून येतो. त्यामूळे राष्‍ट्रीय सेवा योजना राष्‍ट्रीय एकात्मतेचे  ‘सशक्त साधन’ आहे असे उदगार कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी काढले.


आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे या महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे खोजेवाडी ता जि सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन समारंभात प्रमुख उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड हे होते .


मा. आमदार मनोज दादा घोरपडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, युवकांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून दत्तक खेड्याचा विकास साधण्यासाठी गावाच्या आवश्यकतेनुसार नियोजित प्रकल्प कार्यान्वित करावेत. शिबीरात श्रमदानातून समाजसेवा व उदबोधन कार्यक्रमांमधून मूल्ये व चांगले विचार आत्मसात करावेत. आजचा युवक हा उद्याचा सुजाण नागरिक आहे यासाठी त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे.


विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले , श्रमसंस्कार शिबिर कालावधीमध्ये सहजीवन, सहशिक्षण व सहभोजन या प्रक्रियांच्या माध्यमातून सर्वधर्मी समानत्व या भावनेचा विकास होतो. स्वयंसेवकांनी लोकांशी संवाद साधावा. आणि संवादकौशल्य अवगत करावे. 


या कार्यक्रमात खोजेवाडी ग्रामस्थांच्यावतीने मा. आमदार मनोज दादा घोरपडे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित. या समारंभाच्या सुरुवातीस शिक्षणमहर्षी  बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथील प्रोफेसर प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांचा एन एस एस स्फूर्ती गीतांचा कार्यक्रम  संपन्न झाला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जयमाला उथळे यांनी केले तर आभार डॉ सुनील पवार यांनी मानले.


या कार्यक्रमासाठी मा. संजय बाबा घोरपडे (प.स. सदस्य) , सौ वैशाली घोरपडे (सरपंच , खोजेवाडी) श्री अशोक भिवा मदने (उपसरपंच खोजेवाडी) ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर व सर्व ग्रामस्थ तसेच  राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरातील सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,  ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments