Type Here to Get Search Results !

नागठाणे गटातील युवा नेतृत्व नंदकुमार नलवडे


 नागठाणे गटातील युवा नेतृत्व नंदकुमार नलवडे..

देशमुखनगर (सतिश जाधव) : उच्च शिक्षण घेऊन एखादी नोकरी करून केवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि स्वार्थ न बघता आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून जन्मभूमी आणि परिसरातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी जपणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून सातारा तालुक्यातील नागठाणे जिल्हा परिषद गटातील नंदकुमार नलावडे हे ओळखले जातात. 

    श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे यांचे नेतृत्व मानणारे नागठाणे येथील चौंडेश्वरी पतसंस्थेचे माजी संचालक आणि तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नंदुनाना हे नागठाणे भागातील तरुणांचे  ते मार्गदर्शक ठरत आहेत. शेती करत वीटभट्टीच्या व्यवसाय करत असताना आश्रमशाळा, मतिमंद शाळा, हायस्कूल, मंदिरे येथे आर्थिक मदत करत गरजू गरिबांना तसेच दवाखान्यासाठी आर्थिक मदत करत असतात. हायस्कूलसाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तीस लाख रुपये जमा करून एक इमारत बांधली. आता हायस्कूलला सभामंडप बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. अनेक मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबीरे, वृक्ष लागवड, खेळांच्या स्पर्धा सतत राबवल्या जातात.  निराधार, अपंगांना पेन्शन मिळवून देणे, मागासवर्गीय लोकांना भूखंड मिळवून देणे अशी समाज उपयोगी कामे मार्गी लावलीत. केवळ एवढेच कार्य मर्यादित न ठेवता गावात शासकीय योजना नेहमी राबवण्यात ते सक्रिय असतात सत्तेत राहून केवळ राजकारण न करता नंदू नाना यांनी समाजकारणाची कास धरली आह.  

    शासनाच्या सर्वच योजनाद्वारे गावाचा विकास कसा साधता येईल याकडे त्यांचे अधिक लक्ष असते. सामाजिक लढ्यात महामार्गाच्या पुलासाठी आंदोलन करून पुलाचा प्रश्न मार्गी लावला. आपल्या राजकीय कारकीर्दीत कुठलाही गर्व न करता एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच ते गावासह परिसरातील आबालविरुद्ध, तरुणांमध्ये मिसळतात. त्यांनी नागठाण्यासह परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेकदा पाठपुरावा करून विकासाला हातभार लावला आहे.

Post a Comment

0 Comments