*विकास कामात माझा कोणीही विरोधक नाही..... आमदार मनोजदादा घोरपडे*
*निनाम येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न*
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा.मनोजदादा घोरपडे यांची आमदार पदी निवड झाल्यावर त्यांचा सत्कार समारंभ व विविध विकास कामांचे भूमिपूजन निनाम येथे नुकतेच पार पडले यावेळी विकास कामांमध्ये माझा कुणीही विरोधक नाही. ज्या नागरिकाचे काम असेल त्याचे काम सोडवण्यास मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कायमच आपल्या सेवेत हजर असेन असे आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले. यावेळी अंजलीताई जाधव, माधवराव गुरव, सरपंच सुभाष वायदंडे, विलास कदम, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम आमदार मनोजदादा घोरपडे यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावच्या वतीने आमदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रजीमा 32 वरील मौजे निनाम गाव मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस 500 मीटर एकूण 1 किमी आरसीसी गटर बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मा.मनोजदादा घोरपडे म्हणाले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण येणार नाही. लोकांना ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी कोणताही पक्ष ,पार्टी याचा विचार न करता येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी जसा आजपर्यंत कार्यरत होतो तसाच इथून पुढे सुद्धा करत राहणार आहे.
यावेळी निवासराव निकम, सुभाष कदम,हरीश आबा पाटील, नंदकुमार पाटील ,सुधीर काका जाधव ,अमिता जाधव, आनंदराव जाधव, मोहिनी जाधव, संजय महाडिक ,शंकर जाधव ,ज्योतीराम पाटील, जहागीर महाडिक, रामचंद्र जाधव ,जनार्दन जाधव, बापूराव महाडिक ,निलेश जाधव, ज्योतिराम जाधव, राजन पवार, गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments