Type Here to Get Search Results !

पं. स. जि. प. च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मार्ग खडतर.

 पं. स. जि. प. च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मार्ग खडतर..

देशमुखनगर (सतिश जाधव) : विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदार संघात राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाल्याने प्रमुख नेत्यासह कार्यकर्त्यामध्ये मरगळ आल्याचे चित्र आहे. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची संकेत आहेत, या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षातील राष्ट्रवादीचा मार्ग खडतर असल्याची परिस्थिती आहे, तर दुसरीकडे महायुतीतून लढण्यासाठी तुंबळ गर्दी होणार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. तर काही नेते येत्या काही महिन्यात पक्षांतर करतील अशी चर्चा देखील जोर धरत आहे. 

     विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मध्ये भाजपला यश मिळालं. शरद पवार पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे येथे राष्ट्रवादी विधानसभेच्या आखाड्यातून बाद झाली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची धुळधाण झाल्याने सत्येशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणे कठीण जाणार असल्याने, काही दिग्गज स्थानिक नेत्यांनी सत्तेतील पक्षाकडून  निवडणुकीत उभे राहता येईल काय अशी चाचपणी सुरू केल्याची चर्चा होत आहे. कराड उत्तर मतदारसंघात भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. कराड उत्तर मधील बहुतांश लढती राष्ट्रवादी विरुद्ध भाजप गटात होतील मात्र येथे भाजपकडून निवडणूक लढवण्याची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी गटात कडून इच्छुक निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे चित्र आहे. 

    राष्ट्रवादीचे काही जण माजी जिल्हा परिषद सदस्य आता पुढील काळात काय भूमिका घेतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे . त्यांच्या समर्थकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवायची झाल्यास नेमकी कोणत्या पक्षाकडून लढणार हा प्रश्न अजूनही निकाली निघाला नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यात हेच, " ते " कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. आता कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याचे संकेत मिळत असल्याने इच्छुकांनी संपर्क वाढवला आहे.

Post a Comment

0 Comments