Type Here to Get Search Results !

दारूची वाहतूक करणारे बोरगाव पोलिसांनी घेतले ताब्यात


 दारुची वाहतूक करणारे बोरगाव पोलिसांनी घेतले ताब्यात 

देशमुखनगर :  सातारा तालुक्यातील बोरगाव ठाण्याच्या पोलिसांनी देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

    पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एस वाळवेकर यांना कुमठे गावच्या हद्दीत शेळकेवाडी ते शेरेवाडी रस्त्यावर चोरटी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या, त्यानुसार  पोलिसांना शेरेवाडी बस स्टॉप जवळ  दोन संशयित दोन एक्टिवा दुचाकीवरून येत असताना दिसले, त्यांना थांबवून दुचाकीवर बांधलेल्या पोत्यांची तपासणी केली असता, त्या पोत्यात देशी-विदेशी दारूच्या बाटल्या मीळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यांनी प्रथमेश शिवाजी ठोंबरे रा. जकातवाडी ता. सातारा आणि सचिन ज्ञानेश्वर चव्हाण रा. वेचले ता. सातारा अशी नावे सांगितली. ही दारू वाढे फाटा येथील गोल्डन वाईन शॉप येथील असून पंकज पवार राहणार  मोरे कॉलनी सातारा यांच्याकडून घेऊन आलो असून कुमठे येथील वैभव  मोहन निमज यास विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. बोरगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन देशी विदेशी दारूच्या बाटल्या, दोन दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण दोन लाख 14 हजार 340 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

    ही कारवाई स. पो. नि. डी एस वायकर व उपनिरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक कुमार मांडवे, सत्यम थोरात, संजय जाधव, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस आमदार प्रशांत चव्हाण, सतीश पवार, अतुल कणसे, केतन जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments