Type Here to Get Search Results !

साताऱ्यात पत्रकारांसाठी कार्यशाळा

 साताऱ्यात  पत्रकारांसाठी कार्यशाळा 


छत्रपती शिवाजी कॉलेज आणि पत्रकार संघाने केले आयोजन 


देशमुखनगर : रविवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे सातार्‍यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत दिल्‍ली येथील पत्रकार प्रशांत कदम हे प्रमुख वक्‍ते सातार्‍यातील पत्रकारांशी संवाद साधणार आहे.पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा," असे आवाहन पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे असून प्रमुख उपस्‍थित म्‍हणून महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय  अधिस्‍वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्‍थिती असणार आहे.


सातारा पत्रकार संघ,सातारा तालुका पत्रकार संघ आणि रयत शिक्षण संस्थेचे सातारचे छत्रपती शिवाजी कॉलेज यांनी संयुक्‍त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


" राष्ट्रीय पत्रकारीता व माध्यमाचं लोकशाहीकरण" या विषयावर पत्रकार प्रशांत कदम हे बोलणार आहेत. सातार्‍यातील प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून पत्रकार, छायाचित्रकारांनी उपस्‍थित रहावे,'असे आवाहन सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्ष उमेश भांबरे तसेच सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, उपाध्यक्ष विजय जाधव, सुनील साबळे, कार्याध्यक्ष बाळू मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments