Type Here to Get Search Results !

बेटी बचावो, बेटी पढाओ जनजागृती मोहिम.


बेटी बचाओ , बेटी पढाओ जनजागृती मोहिम                                     देशमुखनगर : महाराष्ट्र शासनाचे बेटी बचाओ , बेटी पढाओ अभियानास १० वर्षे पुर्ण झालेने, सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाणे आणि श्री . रामकृष्ण विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज नागठाणे यांचे संयुक्त विद्यमानाने बेटी बचाओ , बेटी पढाओ जनजागृती रॅलीचे आयोजन करणेत आले होते . सदर रॅलीचे नियोजन महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील व प्राचार्य , शिक्षक स्टाफ यांनी केले असुन त्यामध्ये मुलींनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेवुन हातामध्ये बेटी बचाओ , बेटी पढाओ या घोषवाक्याचे फलक घेवुन घोषणा देवुन नागठाणे परिसररात जनजागृती केली . सदर रॅली मध्ये गर्भलिंग निदान , गर्भहत्या , बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथांना आळा घालणे आवश्यक असलेचे अवाहन करणेत आले . सध्याच्या युगात मुली शिक्षणाच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे . त्यामुळे त्यांना शिक्षण देणे महत्वाचे असलेचे सागंणेत आले . सदरचे बेटी बचाओ , बेटी पढाओ अभियान मा.समीर शेख , पोलीस अधीक्षक सातारा , मा . वैशाली कडुकर , अपर पोलीस अधीक्षक , सातारा , मा . राजीव नवले , पोलीस उपअधीक्षक , सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली धोंडीराम वाळवेकर , सहा . पोलीस निरीक्षक , स्मिता पाटील , महिला पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत .
 

Post a Comment

0 Comments