Type Here to Get Search Results !

नागठाणे महाविद्यालयात सायन्स विभागाच्यावतीने भित्तीपत्रिकेचे प्रकाशन


 नागठाणे महाविद्यालयात सायन्स विभागाच्यावतीने भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

देशमुखनगर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज , नागठाणे या महाविद्यालयात विज्ञान विद्याशाखेतील वनस्पतीशास्त्र विभाग व निसर्गमंडळाच्यावतीने 'पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामधील जैवविविधता अभ्यास ' या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 सह्याद्रीमध्ये असणारे प्रादेशिक वनस्पती व त्यांचं मेडिकल सायन्स मधील महत्व,, दुर्मिळ वनस्पती,, संपत चालेल्या वनस्पतीच्या जाती,, नव्याने विशाळगडावर सापडलेली -शोध लागलेले सेरोपेजिया शिवरायींना ही कंदीलपुष्प वनस्पती या सर्व विषयाचा अभ्यास या भित्तीपत्रिका उदघाटनाच्या माध्यमातून विद्यार्थांपर्यंत पोहचवण्याचे काम केले.

 भित्तिपत्रिका उदघाटन प्रसंगी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड म्हणाले , पश्चिम घाट अनेक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे कारण म्हणजे या प्रदेशातील वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींची प्रचंड विविधता आणि विपुलता आहे. कास पठार किंवा पाचगणीच्या पठारावर उमललेली फुले पर्यटकांबरोबरच अभ्यासकांना  आकर्षित करतात. निसर्गाचा हा  ठेवा पुढील पिढ्यांना पाहण्यासाठी त्याचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे.  

याप्रसंगी डॉ. राजाराम कांबळे डॉ. अजितकुमार जाधव, प्रा अभय जायभाये , डॉ. नागनाथ चोबे व डॉ. जयमाला उथळे यांनी  मनोगत व्यक्त केले. 

भित्तिपत्रिकेचे वाचन वनस्पतीशास्त्र विभागातील कु. साई सुतार,  कु.आश्विनी जाधव, कु.रसिका मोहिते व कु. साक्षी घाडगे यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत प्रा. पूजा कदम यांनी केले. तर आभार प्रा. संध्या पाटील यांनी मानले. त्यावेळी विज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. अभिलाषा देशमुख, प्रा. आचल तावरे, प्रा. सुनिता जाधव तसेच  महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments