नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बोरगाव पोलिसांकडून कारवाई देशमुखनगर : नागठाणे ( ता . सातारा ) येथे रामकृष्ण विद्यामंदिर व एस टी स्टँड परिसरात बोरगाव पोलिसांकडून सलग दोन दिवस धडक कारवाई करत वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला . टू व्हिलर ट्रिपल सीट , विना लायसन्स गाडी चालवणाऱ्यांवर महाराष्ट्र मोटार कायद्यानुसार १७ जणांवर कारवाई करण्यात आली . या कारवाईत १३ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला . तसेच कॉलेज परिसरात विनाकारण घोळका करून दंगा करणाऱ्या ३० जणांवर कारवाई करण्यात आली . ही कारवाई स. पो. नि. डी . एस . वाळवेकर , पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील , सुधीर भोसले , पो . ना . प्रशांत चव्हाण , केतन जाधव , उत्तम गायकवाड , सतीश पवार यांनी केली . "
Post a Comment
0 Comments