कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे किसान सन्मान समारंभ कार्यक्रम संपन्न
देशमुखनगर : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव, ता. जि. सातारा येथे पी. एम. किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भागलपुर, बिहार येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमास मा. विधानसभा सदस्य, श्री. मनोजदादा घोरपडे, मा. जिल्हाधिकारी, सातारा, श्री. संतोष पाटील (भा.प्र.से.), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा, श्रीमती. भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा श्री. अजय शेंडे उपस्थित होते.
सातारा जिल्हयातील शेतकरी व गटांच्या माध्यमातुन उत्पादित केलेले विविध शेती उत्पादने व प्रक्रियायुक्त पदार्थ यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदर प्रदर्शनाची पाहणी करुन मान्यवरांनी शेतकरी बांधव, शेतकरी व महिला गटांनी चांगल्या प्रकारे पिकविलेल्या व उत्पादीत केलेल्या शेतमालाची माहिती घेतली व शेतकऱ्यांचे कौतुक केले. मा.आ.श्री. मनोजदादा घोरपडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राचे योगदान खुप मोलाचे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडुन राबविण्यात येणाऱ्या कृषि योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील विविध प्रात्यक्षिक प्रकल्पांना मान्यवर व शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. यावेळी मा. जिल्हाधिकारी, सातारा श्री. संतोष पाटील (भा.प्र.से.) यांनी शेतकऱ्यांनी व महिला गटांनी कृषि विज्ञान केंद्रास भेटी देवुन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केले.
तांत्रिक सत्रामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी नैसर्गिक शेती याविषयी श्री. भुषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ ü व अन्नप्रक्रिया उद्योग व संधी याविषयी डॉ. कल्याण बाबर, विषय विशेषज्ञ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी श्री. रमेश देशमुख, तालुका कृषि अधिकारी, सातारा श्री. हरिशचंद्र धुमाळ, प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, बोरगांव प्रा. मोहन शिर्के, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव डॉ. महेश बाबर तसेच सातारा जिल्हयातील कृषि सहाय्यक, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सातारा जिल्हयातील शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संग्राम पाटील यांनी व प्रास्ताविक श्री. सागर सकटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्वाती गुर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी होणेसाठी कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments