Type Here to Get Search Results !

कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेळी वाटप व प्रशिक्षण संपन्न



 " *कृषि विज्ञान केंद्रातर्फे शेळी वाटप व प्रशिक्षण संपन्न."*.   


देशमुखनगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव तालुका जिल्हा सातारा तर्फे आदिवासी विकास प्रकल्प(TSP) अंतर्गत शेळी वाटप व शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी, प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा उप आयुक्त पशुसंवर्धन डॉ. दिनकर बोर्डे हे उपस्थित होते त्यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना शेळीपालन व्यवसायाचे महत्त्व तसेच व्यवसाय करत असताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. पंचायत समिती जावली येथील विस्तार अधिकारी पशुसंवर्धन डॉ. अनिल चपने यांनी जनावरांचे आजार व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. पशुधन विकास अधिकारी, सायगाव डॉ. माधव जाधव यांनी विमा संरक्षण व पशुवैद्यकीय दवाखान्यामधून मिळणाऱ्या सेवांबद्दल माहिती दिली. कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव डॉ. महेश बाबर यांनी लाभार्थी कुटुंबीयांना शेळ्यांचे योग्य संगोपन करून शेळीपालन व्यवसाय वाढवण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत, रायगाव येथील सरपंच श्रीमती हसीना मुजावर यांनी गावामध्ये राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. संतोष बरकडे यांनी शेळीपालन व नैसर्गिक शेती हे परस्पर पूरक कसे आहेत याविषयी माहिती दिली. श्री भूषण यादगिरवार, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी नैसर्गिक शेती बाबत मार्गदर्शन केले. श्री संजय घोरपडे मंडळ कृषी अधिकारी, कुडाळ यांनी नैसर्गिक शेती योजनेबाबत माहिती दिली. प्रगतशील शेतकरी श्री जितेंद्र कदम यांनी आपल्या शेतामध्ये राबवण्यात येणाऱ्या प्रयोगांबाबत माहिती दिली.


या कार्यक्रमांमध्ये रायगाव तालुका जावळी येथील कातकरी समाज बांधवांना शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी उस्मानाबादी जातीच्या शेळी व बोकड यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सागर सकटे, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी केले. मान्यवरांचे स्वागत माजी सरपंच श्री क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रायगाव गावचे उपसरपंच श्री समाधान गायकवाड व कृषी सहाय्यक श्री मोहिते यांनी विशेष सहकार्य केले. सदर कार्यक्रम प्रसंगी रायगाव व पंचक्रोशीतील शेतकरी कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कृषी विभाग व आत्मा तालुका जावली येथील अधिकारी कृषी सहाय्यक, महिला बचत गट, उमेद गट प्रतिनिधी, जावली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष श्री प्रशांत गुजर व सचिव धनंजय गोरे, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथील श्री बजरंग कदम व श्री रोहित गायकवाड हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments