नागठाणे महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यान संपन्न
देशमुखनगर : आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे या महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधनी विभागाच्यावतीने "AI Tools for Smart Teaching - Learning and Research" या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
या व्याख्यानपर कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनीषा सुतार यांनी ChatGPT या विषयावर आपले विचार व्यक्त करताना , ChatGPT कसे कार्य करते, त्यासाठी प्रभावी प्रॉम्प्टिंग कसे करावे, आणि त्याचा शैक्षणिक आणि संशोधन कार्यात कसा उपयोग करता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात, प्रा. शैला चोबे यांनी Paperpal AI या संशोधन सहायक टूलची माहिती दिली. रिसर्च पेपर लेखन, रिव्ह्यू पेपर, सायटेशन व्यवस्थापन, प्लॅगॅरिजम तपासणी आणि भाषाशुद्धीकरण यासाठी हे टूल कसे उपयुक्त आहे, यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापकांनी स्वतः वापरत असलेल्या AI टूल्सची माहिती शेअर केली यामध्ये डॉ. सुरेश पाटील यांनी Meta AI, डॉ. नागेश चोबे यांनी Grok AI, डॉ. जयमाला उथळे यांनी Grammarly, तर प्रा. रणधीर शिलेवंत यांनी Napkin AI आणि Perplexity Search Engine या टूल्सबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यामुळे या सत्राद्वारे अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध AI टूल्सच्या उपयोगांची सखोल माहिती मिळाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी शैक्षणिक क्षेत्रात "AI चा योग्य आणि कौशल्यपूर्ण वापर केल्यास शिक्षकांचे अध्यापन अधिक प्रभावी होईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना नव्या दिशा व संधी उपलब्ध होतील."
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रणधीर शिलेवंत यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शितल सालवाडगी यांनी केले. आभार डॉ. संतोष सोंडगे यांनी मानले. या यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अभय जायभाये यांनी विशेष मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments