Type Here to Get Search Results !

एसटी चालकास कुराडीने धमकावणारा फाळकुट दादा गजाआड.


 *एसटी चालकास कुराडीने धमकावणारा फाळकुट दादा गजाआड* 


कुऱ्हाडीसह सत्तुर हस्तगत, उंब्रज पोलिसांची

कारवाई


उंब्रजः धमकी देणाऱ्या संशयितास पकडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व इतर.


उंब्रज प्रतिनिधी / गौरव खवळे 


एसटीला दुचाकी आडवी मारत एसटी चालकास कुऱ्हाडीसह सत्तुराचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी संशयिताने दिली होती. ५ मार्च २०२५ रोजी उंब्रज ता. कराड येथे  ही घटना घडली. यानंतर अवघ्या एका तासात सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेऊन एसटीचालकास धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. राहुल मोहन आटोळे (वय २४ रा. उंब्रज ता. कराड जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज अशोकराव पाटील (वय ३८ रा. ढेबेवाडी ता. पाटण) यांनी पाटण ते सातारा एसटी उंब्रजसेवा रस्त्या लगत  प्रवासी उतरवण्यासाठी ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता थांबवली. यावेळी संशयित राहूल आटोळे हा वेगाने दुचाकी घेऊन तिथे आला. त्याने त्याची दुचाकी एसटीला आडवी लावून तो कुऱ्हाड व सत्तुर घेऊन चालकाच्या दिशेने धावला. तु एसटी पुढे न्यायची नाही. एसटी पुढे नेली तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत कुऱ्हाड व चाकुचा धाक दाखवला. सुमारे १५ मिनिटे हा प्रकार भररस्त्यात सुरू होता. उंब -जचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे हे पोलीस पथकासह घटनास्थळाकडे रवाना झाले मात्र तोपर्यंत संशयित पसार झाला होता. भोरे यांनी घटनास्थळावर माहिती घेऊन मनोज पाटील यांना तात्काळ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्यास सांगितले. यानंतर भोरे यांनी स्वतः संशयिताच्या तपासासाठी रवाना होत अन्य दोन पथके रवाना केली. यामधे पोलीस उपनिरीक्षक खबाले, कॉन्स्टेबल संजय धुमाळ, हवालदार पवार, श्रीधर माने, राजकुमार कोळी यांचा सहभाग होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या एका तासांच्या आत संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या मुसक्या आवळत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली. कायद्याचे उल्लंघन करून धाक दाखविणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही कडक कारवाई करण्याचा इशारा  सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिला असून गुन्ह्याचा पुढील तपास ते स्वतः करीत आहेत.

Post a Comment

0 Comments