हद्दपार आरोपीच्या ताब्यातून बेकायदा दारु जप्त . देशमुखनगर : विक्रम अधिकराव यादव रा . अतित ता . जि . सातारा याला मा . उपविभागीय दंडाधिकारी सातारा विभाग सातारा यांनी सातारा जिल्ह्यातुन ६ महिन्याकरीता हद्दपार केले आहे . यादव याने या आदेशाचे उल्लंघन करुन सातारा जिल्ह्यात प्रवेश करुन समर्थगाव ते अतित जाणारे रोडवर मोटर सायकल वरून जात असताना तो पोलिसांना दिसून आला . त्यावेळी त्याच्या मोटार सायकलवर असले पांढऱ्या रंगाचे पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये ७१ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. असा एकूण ३७,४८५ रूपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला. हि कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा , वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक , सातारा , राजीव नवले पोलीस उपअधीक्षक , सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली धोंडीराम वाळवेकर सहा . पोलीस निरीक्षक , पो.हे.कॉ. संतोष चव्हाण , पो . कॉ.केतन जाधव , सतीश पवार यांनी केली आहे .
Post a Comment
0 Comments