बोरगाव पोलिसांची दमदार कामगिरी
February 28, 2025
0
बोरगाव पोलिसांची दमदार कामगिरी. देशमुखनगर : सातारा तालुक्यातील बोरगांव पोलीस ठाण्याच्या हददीतून नागरिकांचे गहाळ झालेले एकुण 4,82,500 / - रु . किंमतीचे 33 मोबाईल गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन मुळ मालकांना परत . बोरगांव पोलीस ठाणे हददीमध्ये मोबाईल गहाळचे प्रमाण वाढल्याने श्री . समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा , श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा , श्री . राजीव नवले उपविभागीय पोलीस अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . डी . एस . वाळवेकर यांना नागरीकांचे हरवलेले मोबाईल शोध घेणेकामी सुचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे सहा . पोलीस निरीक्षक श्री . डी . एस . वाळवेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार केतन जाधव व पोलीस अंमलदार यांना नागरीकांचे हरविलेले मोबाईलचा शोध घेणेकामी मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या . त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील केतन जाधव व पोलीस अंमलदार यांनी सीईआयआर पोर्टल वर इतर तांत्रीक माहीती प्राप्त करुन महाराष्ट्रातील व परराज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहीम राबविल्याने बोरगांव पोलीस ठाणे हददीतून नागरिकांचे गहाळ झालेले एकुण 4,82,500 / - रु किंमतीचे 33 मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे . सदरची मोहीम श्री . समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा , श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा , श्री . राजीव नवले उपविभागीय पोलीस अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली अशाचप्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे बोरगांव पोलीस ठाणेचे सहा . पोलीस निरीक्षक श्री . डी एस वाळवेकर यांनी सांगितले आहे . तरी आजपर्यंत गहाळ झालेल्या मोबाईल पैकी 86 मोबाईल नागरिकांना परत देण्यात बोरगांव पोलीसांन यश आले आहे . अश्याप्रकारे बोरगांव गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रीक माहीती प्राप्त करुन महाराष्ट्रातुन व परराज्यातुन नागरिकांचे गहाळ झालेले एकुण 4,82,500 / - रु . किंमतीचे 33 मोबाईल हस्तगत करुन ते श्री . राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचे हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत . सदरची कारवाई ही बोरगांव पोलीस ठाणेचे सहा . पोलीस निरीक्षक श्री . डी एस वाळवेकर व महीला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार पो.ना. प्रशांत चव्हाण , पोना दिपककुमार मांडवे , पोकों सतिश पवार पोकाँ अतुल कणसे पो काँ केतन जाधव व सायबर पोलीस ठाणेचे पोकाँ महेश पवार यांनी केलेली आहे .

Post a Comment
0 Comments