*कामगार नेते संजयबापू निकम यांचा भाजप प्रवेश*
देशमुखनगर : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय निकम बापू यांनी काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष मा.ना.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, व कार्याध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण साहेब व कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या 29000 माथाडी कामगारांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
कराड उत्तर मतदार संघातील आपशिंगे मि.गावचे युवा नेते व कामगार नेते मा. संजय बापू निकम ,पोपटराव पाटील,आप्पा चीकणे, युवराज घोरपडे, कुंदन शिंदे, आदी हजारो कार्यकर्तेसह प्रवेश केला . यावेळी मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले संजय निकम यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला निश्चितच बळकटी मिळेल.लवकर मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली मोठा कामगार मेळावा करण्यात येणार आहे.
यावेळी रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणाले कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी बोलताना मा.आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले संजय बापू यांनी मला विधानसभा निवडणुकीत मदत केली असून इथून पुढे पक्ष संघटनेसाठी त्यांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. जुने पदाधिकारी आणि नवे पदाधिकारी यांच्यात मेळ घालून त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी देण्यात येणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीसह इतर कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यांच्या प्रवेशाबद्दल जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन lराजे भोसले, श्रीमंत छत्रपती बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments