Type Here to Get Search Results !

सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक होणार चुरशीची...?

सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक होणार चुरशीची...?

देशमुखनगर (सतिश जाधव) : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून, अर्ज दाखल करण्यास आज 27 तारखेला प्रारंभ झाला आहे. कराड तालुक्याच्या सहकार चळवळीचा आणि त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींचा मुख्य कणा असलेल्या सह्याद्री कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड होत आली आहे, मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडीत सह्याद्री कारखाना केंद्रस्थानी राहिला. त्यामुळे आता सह्याद्रीची निवडणूक होत असताना, त्यात चुरस निर्माण होणार असल्याचा अंदाज असून. या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडीची परंपरा खंडित होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.

     करत उत्तर मतदार संघातील विधानसभेचे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीचे आमदार मनोज दादा घोरपडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या विजयाच्या गणितात सह्याद्री कारखान्याची महत्त्वाची भूमिका  राहिली. त्यामुळे आता कारखान्याची निवडणूक होत असताना त्यात चुरस निर्माण झाली आहे. 

     सह्याद्री कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. 27 फेब्रुवारी पासून अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. पाच एप्रिल रोजी मतदान होणार असून सहा एप्रिलला मतमोजणी केली जाणार आहे.

 

Post a Comment

0 Comments