२०२४ ठरले कराड उत्तरच्या परिवर्तनाचे वर्षं.
देशमुखनगर (सतिश जाधव) : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आले, शशिकांत शिंदे यांचा पराभव करून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार झाले. त्यावेळी मनोज घोरपडेंचा सिंहाचा वाटा ठरला. विधानसभेत कॅबिनेट मंत्री राहिलेले बाळासाहेब पाटील यांचा पराभव करून जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे हे आमदार झाले, त्यामुळे कराड उत्तरकारांसाठी 2024 हे नक्कीच परिवर्तनाचे वर्ष ठरले आहे. आगामी 2025 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, साखर कारखाना निवडणुकांमध्ये काय होणार हा आता उत्सुकतेचा विषय होणार आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांनी गेली 25 वर्षे आमदारकी ताब्यात असलेले आणि राजकारणात मुरब्बी असलेले मंत्री बाळासाहेब पाटील यांचा धक्कादायक पराभव करून आमदारकीची सत्ता हस्तगत केली. कराड उत्तरच्या राजकारणामध्ये सण 2024 मध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे हे वर्ष परिवर्तनाचे ठरले. यापूर्वीच्या दोन वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तेंव्हापासून मात्र घोरपडे यांनी सातत्याने सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवला. तसेच युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, यांच्यासह गावातील युवकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. भाजपा बरोबर असलेल्या घटक पक्षासह अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण साथ मिळवली, त्यामुळे घोरपडे यांचा विजय सुखकर झाला .
कराड उत्तर मध्ये या राजकीय घडामोडीमुळे 2025 मध्ये आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, साखर कारखाना या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा सर्व सहकार्यांची मोट बांधून कार्यकर्त्यांना कशाप्रकारे संधीचे दिली जाईल हे आगामी काळातच समोर येणार आहे.
Post a Comment
0 Comments