Type Here to Get Search Results !

देगाव शाळेचे आयटीएस परीक्षेत घवघवीत यश.


 देगाव शाळेचे आयटीएस परीक्षेत घवघवीत यश .


सहा विद्यार्थी राज्यात चमकले .


देशमुखनगर : . ता 12जिल्हा परिषद शाळा देगाव पाटेश्वर या शाळेचे आयटीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून या परीक्षेत इयत्ता पहिलीचे तब्बल सहा विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात चमकले असून जिल्हास्तरावर आपले नावलौकिक कमावला आहे .

    इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी घेण्यात आलेल्या आयटीएस परीक्षेत भक्ती साळुंखे व आराध्या कुंभार राज्यात दुसरी ,कार्तिकी माहमुलकर व सिद्धी वाघमोडे राज्यात चौथी राज माहमुलकर, अर्णव फडतरे राज्यात 

पाचवा क्रमांक पटकावला .ओवी घाडगे, विघ्नेश साळुंखे सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. कार्तिक वाघमोडे, शौर्य देशमुख, निरंजन जाधव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. आरुष घाडगे, सान्वी साळुंखे यांनी जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. ओवी साळुंखे, सानिका साळुंखे, आराध्य सपकाळ, अंश कुंभार यांनी पाचवा नंबर मिळवला. विघ्नेश दळवी, आदिती साळुंखे, रुद्र पोतदार यांनी केंद्र स्तरावर पहिला नंबर मिळवला . मनस्वी कारबळ, आकाश कुंभार केंद्रात दुसरा आला. अनुज वाघमारे केंद्रात तिसरा क्रमांक पटकावला. सिद्धांत माने यांनी केंद्रात चौथा क्रमांक मिळवला. शिवम पिसाळ यांनी केंद्रात पाचवा क्रमांक मिळवला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षण विस्ताराधिकारी सुजाता जाधव,  केंद्रप्रमुख उद्धव भस्मे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेम सागर साळुंखे, उपाध्यक्ष अनिता जौंजाळ,शिक्षण तज्ञ विकास पवार तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, देगावचे सरपंच, उपसरपंच यांनी अभिनंदन केले.

  यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक  कोमल उदय जाधव, प्रतिभा जयदीप घोरपडे व  मुख्याध्यापिका राणी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले .

Post a Comment

0 Comments