Type Here to Get Search Results !

वै. ह. भ. प. लक्ष्मण पाटील महाराज यांचे अल्पशा आजाराने निधन.


देशमुखनगर : कोरेगाव तालुक्यातील किरोली येथील नामवंत किर्तनकार वै. हा. भ. प.  लक्ष्मण पाटील महाराज यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. चैतन्य सदगुरु तात्यासाहेब (आबासाहेब) वासकर महाराजांचे निष्ठावंत पाईक म्हणून आयुष्यभर त्यांनी वासकर महाराजांच्या फडाची व वारकरी संप्रदायाची सेवा केली. अनेक गावांत पायी दिंडी चालक,  मालक म्हणून परीचीत होते.  वै.ह.भ.प लक्ष्मण महाराज पाटील किरोली (बापू) यांना शनिवार दि.12/4/2025 रोजी देवाज्ञा झाली यांच्या पश्चात त पत्नी दोन मुले व दोन मुली आहेत .यांचा

सावडने विधी व  दशक्रिया विधी सोमवार दि.14/4/2025 सकाळी 8 वाजता कृष्णाकाठी किरोली या ठिकाणी होईल.

Post a Comment

0 Comments