नागठाणे, अतित, देशमुखनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ.
देशमुखनगर : तरुण, किशोरवयीन मुलांचा समूह तयार करून गुन्हेगारी करण्याचे फॅड सध्या सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागठाणे, अतीत, देशमुखनगर, अपशिंगे परिसरात जोरात सुरू आहे. तरुणांना गुन्हेगारीकडे ओढणे, अवैध धंदे करण्यास परावृत्त करणे, मारामारी करणे, दमबाजी करणे असे प्रकार वाढत असल्याने सामाजिक शांतता बिघडत आहे.
सध्या ग्रामीण भागात किशोरवयीन व तरुण मुलांमध्ये दाढी वाढवणे, मिशा वाढवणे मुलांचा समूह तयार करून, परिसरात आपल्या नावाचा दबदबा निर्माण व्हावा अशी क्रेझ वाढत आहे. याचाच गैरफायदा घेत काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हेगार व स्वयंघोषित युवा नेते, तथाकथित राजकीय नेते विविध नावे वापरून समूह तयार करतात. अल्पवयीन आणि तरुणाई गुन्हेगारीचे अनुकरण करून गंभीर गुन्हे करणे हा उद्देश असतो परिणामी हाणामारी, लूटमार , दबाव, दादागिरी करणे असे प्रकार वाढू लागले आहेत. अल्पवयीन आणि तरुणाईचे आयुष्य बरबाद होऊ लागले आहे. तरुणाई मागे असल्याने स्थानिक नेते त्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावत असल्याने पोलिसी अशा सुमाहाकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी अशा ग्रुपमधील तरुणाईचे मनोबल वाढत चालले आहे. सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आहे असून आले असून सामान्य माणसात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराजे देसाई यांनी लक्ष घालावे अशी मागणी जनमाणसातून होत आहे.


Post a Comment
0 Comments