नेते मंडळींचे लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे.
देशमुखनगर (सतिश जाधव) : सातारा तालुक्यातील 197 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवार दिनांक 23 रोजीराजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे येथे होणार आहे. ग्रामपंचायत ताब्यात असेल तरच तालुक्याच्या राजकारणात पद मागता येते. आपल्या गटाचा सरपंच व्हावा ही इच्छा गाव पातळीवरील नेत्यांची असते, त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण काय निघते याकडे गावोगावच्या नेते मंडळींचे लक्ष लागले आहे. गावात वर्चस्व असावे, यासाठी नेतेमंडळी प्रयत्न करतात. कोणत्या प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षण होते यावरून पुढील आखाडे बांधले जातील, त्यामुळे सध्या या आरक्षण सोडतीकडे तालुक्यातील गावोगावच्या नेते मंडळींचे लक्ष लागले आहे.
गावपातळीवरील काम करणाऱ्या अनेकांना सरपंच पदाचे वेध लागले आहेत. सरपंच पद मिळावे यासाठी तालुक्यात जोरदार लढती झाल्या आहेत. त्यात गावपातळीवरील नेत्यांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे. गावपातळीवरील निवडणुका लोकसभा, विधानसभेपेक्षा अधिक अतितटीची होतात. 197 ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,इतर मागास प्रवर्ग, महिला, खुला प्रवर्ग या पद्धतीने आरक्षण सोडत निघेल.


Post a Comment
0 Comments