Type Here to Get Search Results !

बेवारस मृतदेहाची ओळख पटवाण्याचे बोरगाव पोलीसांचे आवाहन


 देशमुखनगर  : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह सापडला असून त्याबाबतची ओळख पटवण्याचे आवाहन बोरगाव  पोलिसांनी केले आहे.


याबाबत बोरगाव  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक १७  एप्रील  रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काशीळ (ता. सातारा ) गावच्या हद्दीतील शिवराजनगर येथे सातारा ते कराड जाणाऱ्या महामार्गालगतच्या सेवारस्त्यालगत  अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे ४५ वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावर निळ्या तांबडया रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, सँडो बनियान,निळसर पांढऱ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे. मृतदेहाच्या उजव्या दंडावर सिंहाचा चेहरा व डाव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजी 'P' अक्षर गोंदलेले आहे. संबंधित इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्याबाबत बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप वाळवेकर यांच्या  ७७९८११८२५९ या क्रमांकावर  व तपासी अधिकारी श्रेणी उपनिरिक्षक सुधीर भोसले यांच्या  ९८९०६२४५०१ या क्रमांकावर  संपर्क साधण्याचे आवाहन, पोलीस ठाण्यातुन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments