Type Here to Get Search Results !

सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग



 सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग 

(शिवथर आरफळ वडुथ वाढे बोरखळ न्हाळेवाडी आसगाव सरपंच पदासाठी ओपन पुरुष)

शिवथर (सुनिल साबळे) : कोरेगाव मतदार संघातील होऊ घातलेल्या सन 2025 ते 30 या वर्षाकरिता बऱ्याच वर्षातून सर्वसाधारण पुरुष यांची सरपंच पदासाठी सोडत निघाली आहे. ही सर्वच गावे राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानली जातात तसेच कोरेगाव मतदार संघामध्ये यातील बऱ्याच गावांमध्ये मतदार संख्या जास्त असल्याने प्रत्येक जण सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत असल्याचे दिसून येणार आहे. सरपंच पद खुल्या प्रवर्गातील असल्याने जो तो मीच सरपंच होणार यासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामध्ये निष्ठावान कार्यकर्ते नाराज देखील होणार याबाबत शंका नाही स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्यांना कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न सरपंच पद आरक्षण सोडत झाल्यापासून निर्माण झाला आहे. 

            कोरेगाव मतदार संघातील वरील गावे विद्यमान आमदार महेश शिंदे तसेच माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघांमध्ये असल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरपंच आपल्याच पक्षाचा तसेच पार्टीचा होण्यासाठी दोन्ही आमदार प्रयत्न करणार यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाणार असेही सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे. 

           गाव पातळीवर ग्रामपंचायतची निवडणूक ही बऱ्यापैकी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न लढवता आणि पातळीवर बरेच गट  एकत्र येऊन निवडणूक लढवत असतात परंतु सध्याचे चित्र फार भयावह झाले आहे त्यामध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांना त्याचा त्रास होत असतो. सरपंच पद खुल्या प्रवर्गातील असल्याने नेत्याच्या जवळ असणारे कार्यकर्ते सरपंच पदासाठी इच्छुक असतात यातील सरपंच पदासाठी कोणत्या कार्यकर्त्यांची निवड करायची हा देखील प्रश्न स्थानिक पातळीवरील नेत्यांना निर्माण होतो त्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याची निवड केल्यास इतर कार्यकर्ते नाराज होऊन वेगळा निर्णय घेतात त्यामध्ये स्थानिक पातळीवरील गटाचे नुकसान होते. परंतु बऱ्याच गावामध्ये स्थानिक पातळीवरील नेत्यांना कार्यकर्ते चांगली किंमत देत असतात त्यामुळे एखाद्यावर अन्याय झाला तर तो सहन करण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. तरच गावाचा विकास होऊ शकतो परंतु जर असे झाले नाही तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. 

         शिवथर आर फळ वडूथ वाढे बोरखळ न्हाळेवाडी आसगाव या सर्व गावांची ग्रामपंचायत निवडणूक अजूनही सहा ते सात महिने लांबणीवर आहे परंतु आत्तापासूनच सरपंच पद ओपन पुरुष पडले असल्याने अनेक पातळीवरील नेत्यांना डोकेदुखी झाली आहे. गावाचा कार्यभार चांगला चालण्यासाठी तसेच गावाचा चांगला विकास होण्यासाठी सरपंच पदासाठी लायक उमेदवार निवडणे हे गावातीलच मतदारांच्या हातात आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी देखील याबाबत विचार करणे गरजेचे आहे निवडणूक जरी लांबनीवर असली तरी आत्तापासूनच योग्य व्यक्ती सरपंच पदासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी चाचपणी केली पाहिजे असेही सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे. सरपंच पदासाठी निवड जर चुकली तर गावाचा विकास होणार नाही त्यासाठी मतदारांनी देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. 

          कोरेगाव मतदार संघातील सर्वच गावे संवेदनशील असल्याने तसेच ज्यादा मतदान असल्याने दोन्हीही आमदार सरपंच आपलाच व्हावा यासाठी प्रयत्न करणारच यात शंकाच नाही.



Post a Comment

0 Comments