Type Here to Get Search Results !

नागठाणे महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन.


 नागठाणे महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन


देशमुखनगर (सतिश जाधव) : येथील आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज नागठाणे हे महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करीत आहे. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत (सन २००० ते २०२५) बी ए , बी.कॉम आणि प्रथमच बी एस्सी पदवी घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा श्री कौस्तुभ गावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी , श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि.२७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.


महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. या स्नेहमेळाव्यात सर्व माजी  विद्यार्थी एकत्र येणार असून, जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. अनेक वर्षांनंतर भेटणाऱ्या मित्र-मैत्रिणींना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्यातील ऋणानुबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळणार आहे.


२५ वर्षाच्या कार्यकाळात महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून. त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे संस्था सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन आणि नागठाणे गावातील प्रतिष्ठित नागरीकांच्या समर्थ साथीने महाविद्यालयाने विविध उपक्रम राबवून शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा विद्यार्थी घडवून  आपल्या कार्यकर्तृत्वाने शिवाजी विद्यापीठात ठसा उलटवला असून नॅक पूर्नमूल्यांकनात महाविद्यालयाने A + ग्रेड मिळून ग्रामीण भागात महाराष्ट्रात प्रथम येणाचा मान मिळवून तुंग भरारी घेतली आहे. तसेच विज्ञान विद्याशाखा सुरू करून विद्यार्थ्यांना विज्ञान विद्याशाखेतून पदवी घेण्याची सोय केली आहे. महाविद्यालयाच्या या वाटचाली संदर्भात या स्नेह मेळाव्यात माहिती दिली जाणार आहे, तसेच  मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच स्नेहभोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.


या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांबरोबर आणि कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळेल. महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ते अधिक दृढ होईल, असा विश्वास महाविद्यालयाच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे.


तरी, आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, नाराठाणे येथून २००० ते २०२५ या काळात शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड , माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक प्रा अभय जायभाये तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश साळुंखे , उपाध्यक्ष श्री विक्रम बागल, सचिव प्रा. रणधीर शिलेवंत, सदस्य श्री प्रदीप बर्गे श्री अमोल साळुंखे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments