सातारा तालुक्यात 'काही खुशी, काही गम'
देशमुखनगर (सतिश जाधव) : सातारा तालुक्यातील 197 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सन 2025 ते 2030 या आरक्षणाची सोडत बुधवार दि. 23 एप्रिल रोजी काढण्यात आली . शेंद्रे येथील स्व. आ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. त्यामुळे संबंधित गावातील स्थानिक राजकारण्यांना पुढील राजकीय नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
सातारा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत सर्वत्र उत्सुकता होती, आपल्या गावात नेमके कोणते आरक्षण निघते याबाबत स्थानिक राजकारणामध्ये चलबिचल सुरू होती. अखेर बुधवारी बालकाच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी विद्यमान सत्ताधाऱ्यांची गैरसोय होणार आहे तर काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे आरक्षण निघाल्याने स्थानिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे. अर्थात बहुतांश ठिकाणी 'काही खुशी, काही गम'चे चित्र दिसून आले. सोडत जाणून घेण्यासाठी तालुक्यातील बहुतांश स्थानिक राजकारणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाव निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे.






Post a Comment
0 Comments