विद्यार्थी व शिक्षकांचा पालकांनी केला गौरव.
देगाव प्राथमिक शाळेतील उपक्रम.
देशमुखनगर (सतिश जाधव) : जिल्हा प्राथमिक शाळा देगाव येथील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गुणगौरव करून पालकांनी समाजाला नवी दिशा दिली आहे.शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या साठी नेहमीच झटत असतो आणि या शिक्षकाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणे हे पालकांचे कर्तव्य असते याच उपक्रमातून देगाव येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत 15 विद्यार्थी आय टी एस सी परीक्षेत 25 विद्यार्थी व गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत 13 मुलांनी आपली चमकदार कामगिरी करून नवीन अध्याय जोडला . सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना अजित घाडगे, अमोल कारबळ,सुधीर पिसाळ, रविराज कुंभार यांनी सर्व मुलांचा ट्रॉफी देऊन गौरव केला.तर मार्गदर्शक शिक्षिका कोमल उदय जाधव व प्रतिभा घोरपडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या साठी रायटिंग पॅड देऊन मुलांचाही गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेमसागर साळुंखे, शिक्षण तज्ञ विकास पवार, सदस्य शितल कारबळ, सुधीर पिसाळ, माजी उपाध्यक्ष डॉ. विजयकुमार साळुंखे उपस्थित होते .यावेळी शिक्षण तज्ञ विकास पवार, डॉ विजयकुमार साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका राणी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

Post a Comment
0 Comments