शुभवी दूध संकलन केंद्राचे उद्घाटन
(शेतकऱ्यांचा जोडधंद्याला स्वामी मिल्क कडून चालना-किरण साबळे पाटील)
शिवथर.(सुनिल साबळे) : स्वामी मिल्क च्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय आहे त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाणार आहे तसेच शुभवि या दूध केंद्रात फॅट डिग्रीची मशीन तसेच आवश्यक साधनसामुग्रीत पूर्णपणे पारदर्शकता ठेवली असल्याने शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव मिळणार आहे असे प्रतिपादन स्वामी मिलचे संस्थापक संचालक तसेच जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांनी केले
त्यावेळी माजी सभापती सुहास गिरी स्वामी मिल्कचे संस्थापक संचालक किरण भाऊ साबळे संचालिका वैशाली साबळे पाटील शितल साबळे महेश शिवणकर सचिन मिठारे योगेश देशमुख सागर खटावकर दिलीप जाधव प्रशांत साबळे सयाजी कदम व विविध भागातील शेतकरी गोपाळ पंताची वाडी तालुका जावली या ठिकाणी शुभवि दूध संकलन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
सौरभ शिंदे म्हणाले-दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी स्वामी मिल्कने हे केंद्र सुरू केले आहे स्वामीं मिल्क च्या माध्यमातून बासुंदी दही ताक दूध याला ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे काही कालावधीमध्येच स्वामीं मिल्क ने आपले नाव संपूर्ण जिल्ह्यात केलेले आहे. गोपाळ पंथाची वाडी तालुका जावली परिसरातील या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तसेच आर्थिक प्रगती होणार आहे त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
गणेश खटावकर यांनी आभार मानले त्यावेळी खर्शी गोपाळकांताची वाडी पानस कळंबे बेलावडे आरडे मुरघर माहेगाव सायगाव या भागातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments