Type Here to Get Search Results !

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त स्तुत्य उपक्रम



 सज्जनगड च्या बुरुजावर कायमस्वरूपी फडकणार भगवा ध्वज!

धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त स्तुत्य उपक्रम

दुर्गनाद प्रतिष्ठानचा उपक्रम 


परळी वार्ताहर;

श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करीत समर्थ नामाचा जयघोष करीत किल्ले सज्जनगडावरील बुरुजावर भगवा ध्वज उभारण्यात आला.

१४मे २०२५ रोजी दुर्ग सज्जनगडावर दुर्गनाद प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धकांनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त धाब्याच्या मारुती जवळील बुरुजावरती कायमस्वरूपी परम पवित्र असा भगवा ध्वज स्थापित केला आणि तो शंभूराजांच्या चरणी अर्पित केला. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज हे काही काळापुरते सज्जनगडावरती वास्तव्यास होते तसेच त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांनी समाधी घेतल्यानंतर श्रीराम मंदिर तसेच त्याच्या खालच्या बाजूला असलेले श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर उभारले अशी इतिहासात नोंद आहे. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धाब्याच्या मारुती जवळील बुरुजा वरती दुर्गनाद प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धकांनी शर्तीचे प्रयत्न करून अगदी त्या परिसरामध्ये आग्या मोहोळ हे सक्रिय असतानाही दुपारी भगवा ध्वज लावण्यासाठी दुर्गसंवर्धकांनी प्रयत्न केला परंतु काही दुर्गसंवर्धकांना माशा चावल्याने दुपारी मोहीम स्थगित करून पुन्हा रात्री जिद्दीने कार्य पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करून रातोरात भगवा ध्वज स्थापित करण्यात आला. तसेच आज दिनांक १४ मे रोजी दुर्ग सज्जनगड कायमस्वरूपी भगवा ध्वज स्थापित करण्यासाठी श्री रामदास स्वामी संस्थांचे विश्वस्त अधिकारी स्वामी भूषण स्वामी सु.ग स्वामी  श्री समर्थ रामदास स्वामी संस्थानचे कार्यवाहक रोकडे बुवा, ग्रामपंचायत परळी, यांनी सहकार्य केले.दुर्गनाद प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धक, कार्यवाहक रोकडे बुवा यांनी झेंड्याचे पूजन करून भगवा झेंडा फडकवला आणि श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर परिसरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्रासह शंभू महाराजांच्या प्रतिमेला त्रिवार मानाचा मुजरा करून अतिशय उत्साहात, जल्लोषात आणि जयघोषत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

.

Post a Comment

0 Comments